गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले पोलिसांचे कौतुकअत्याधुनिक मोबाईल फोरेन्सीक व्हॅनचे लोकार्पण लोकशाही एक्सप्रेस गोंदिया

       लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या निर्धारित केलेल्या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना येथील शहर पोलीस ठाण्याला भेट देवून त्यांनी जिल्ह्यातील पोलीसांचे कौतुक केले.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गुन्हेगारीचा तपास तातडीने लागावा यासाठी जिल्ह्याला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन प्राप्त झाली असून आज या व्हॅनचे लोकार्पण गृह राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या नविन इमारतीची पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या सायबर बोट, सिटीजन फिडबॅक संबंधी माहिती जाणून घेतली.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांसाठी प्रस्तावित असणारे पोलीस स्थानके तसेच निवासस्थान येत्या काळात उभारण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिली.
 याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) पुरुषोत्तम अहेरकर उपस्थित होते.