लोकशाही एक्सप्रेस गोंदिया
गोंदिया - दिव्यागांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावे. दिव्यागांना अपमानास्पद वागणूक देऊ नये तसेच दिव्यागांच्या मदतीसाठी गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण २४ तास खुले असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे प्रतिपादन माननीय नरेश वाळके, न्यायाधीश तथा सचिव गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले.
गोंदिया विधी सेवा प्राधीकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि भाऊसाहेब बोरा मतीमंद निवासी विद्यालय सावरी यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित " जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित" दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी व UDID कार्ड नोंदणी शिबीर आणि कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम भाऊसाहेब बोरा मतीमंद निवासी विद्यालय सावरी इथे घेण्यात आले. या प्रसंगी उपस्थित माननीय न्यायाधीश नरेश वाळके यांच्या सह श्रीमती आरती चिखलोंढे, सरपंच सावरी, कायदेविषयक सलाहगार एड. एकता गणवीर, एड.सुजाता तिवारी, एड. कोमल अटलानी, सायबर सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शेन्दे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर संस्थेचे कोषाध्यक्ष भारत शहारे, डॉ. मोहित गजभिये (नेत्रतज्ञ), डा. आबिद खान (कान, नाक, गळा), डा. मनिष पंधरे (आर्थो), डॉ. मंगेश मस्के (बालरोग), डॉ. ललित मेश्राम (बालरोग तज्ञ), डॉ. राजराजेश्वरी सिंग (मानसिक रोग तज्ञ), डॉ अपुर्व गुप्ता (मेडीसीन), डॉ पायल कटरे, पी.सी. ठाकरे ग्राम पंचायत अधिकारी सांवरी उपस्थित होते. डॉक्टरांनी दिव्यांग बालकांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले आणि UDID कार्ड नोंदणी करण्यासाठी 14 ऑक्टोबरला KTS रूग्णालय गोंदिया इथे उपस्थित राहण्याचे सांगितले आहे. परिसरातील तसेच काटी, रजेगांव व रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत दिव्यांगजणांनी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी, रावणवाडी प्राथमिक केंद्राचे कर्मचारी, ग्राम पंचायत सावरीचे कर्मचारी व भाऊ साहेब बोरा मतिमंद निवासी विद्यालय सावरी येथील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक भारत शहारे यांनी केले तर संचालन मुख्याध्यापिका वैशाली वैद्य व आभार प्रदर्शन धनंजय वैद्य यांनी मानले.