लोकशाही एक्सप्रेस गोरेगांव
गोरेगाव- जगत कला, वाणिज्य आणि इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय , गोरेगाव येथे ग्रंथालय विभागातर्फे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रीत्यर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ . निलकंठ लंजे यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डाॅ. चंद्रकुमार राहुले , प्रमुख उपस्थितीत ग्रंथपाल डाॅ . एकनाथ चंदनखेडे, ग्रंथालय समितीचे सदस्य सर्वश्री डाॅ. जी .के. भगत , डॉ . एम .के .देशपांडे मॅडम , प्रा. संतोष मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते .या
कार्यक्रमाची सुरूवात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली .या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. डॉ . चंद्रकुमार राहुले म्हणाले की , डॉ . ए . पी .जे . अब्दुल कलाम यांचे देशाच्या संशोधन व तंत्रज्ञान विषयक प्रगतीत मोलाचे योगदान आहे . आपला देश महासत्ता व्हावा , अशी डॉ .ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची इच्छा होती. ग्रंथप्रदर्शनीत विविध स्पर्धा परीक्षाविषयक ग्रंथ, सामाजिक व राजकीय विश्लेषणात्मक ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ इ. ग्रंथांचा समावेश होता. या निमित्ताने डॉ .ए. पी. जे . अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. इ.व्ही. चंदनखेडे यांनी केले तर आभार डाॅ. जी. के. भगत यांनी मानले. या कार्यक्रमात प्रा. डाॅ. व्ही .आय. राणे , डॉ. व्ही. टी . गजभिये ,डाॅ.बी.जी. सूर्यवंशी , डॉ .आर. बी .भैरम , डॉ.विजय रहांगडाले ,डाॅ वसुधा मेश्राम , डॉ . ललिता ढवळे मॅडम ,
.डॉ संदिप रहांगडाले . प्रा. के.पी. जाधव , प्रा. वृषभ खुणे, प्रा . सोनाली पाटील मॅडम, प्रा. प्रांजली पाटील मॅडम , प्रा. सुनिता खोब्रागडे मॅडम , श्री.उमेश हटनागर ,श्री. मोरेश्वर सोनवणे, रोहित पटले , कु .चित्रा पारधी, कु. सोमेश्वरी कटरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते .या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.