सरपंच अविश्वास प्रकरणावरून डवा गावात राजकारण पेटलं!*लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया

   लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया 
*सडक अर्जुनी* तालुक्यातील डव्वा ग्राम पंचायतीच्या 
महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात आज मंगळवारी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून गावात चांगलाच  राजकीय गोंधळ उडाल्याने  देश पातळीवरील हे गाव चांगलेच चर्चेत रंगले आहे.

तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आज (१४ ऑक्टोबर) चर्चा सुरू असतानाच वातावरण तापल्याने अविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर गावकऱ्यांनी अक्षरशः धाव घेतल्याने
हातघाई, धक्काबुक्की, ओरडाओरड झाल्याने गावात चांगलाच राजकीय थरार बघायला मिळाला!
स्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला
या झटापटीत काही  जखमी झाले असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, पोलीस निरीक्षक गणेश वनारे, नवेगाव बांधच्या योगिता चाफले, यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डव्वा गावात असं राजकीय नाट्य घडल्याने  जिल्ह्यातील अशा प्रकारची पहिलीच घटना असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी गावात अनेक विकास योजना राबवल्या-पण  राजकारणामुळे 
सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.