एसीबी ची कार्यवाही २० हजार रुपयाची लाच घेताना गृहपालला रंगेहाथ अटक लोकशाही एक्सप्रेस गोंदिया

       लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
बिल काढण्याच्या नावावर कंत्राटदाराकडून आदिवासी वस्तीगृहाच्या गृहपालाने 20 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून गोंदिया एसीबीने गृहपालाला 20 हजार रुपयाची लाच घेताना  रंगेहाथ अटक करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई १५ ऑक्टोबर च्या रात्री उशिरा पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव प्रवीण रघुनाथ तळेगावकर वय ४६ , पद गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह सडक अर्जुनी असे आहे.
सविस्तर असे की  दि 15/10/2025 रोजी तकारदार यांनी तक्रार दिली कि, तक्रारदार हे आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीग्रह सडक अर्जुनी येथे मुलांना भोजन पुरवठा करणारे कंत्राटदार होते. तक्रारदार यांची जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे भुजन पुरवठा केल्याचे 1,75,944 रुपयाचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात व सप्टेंबर महिन्याचे 1,11,116 रुपयाचे बिल काढून देण्यासाठी आरोपी गृहपाल यांनी   सात टक्के प्रमाणे 20,000/रुपये 
लाचेची मागणी केलेबाबत तक्रार केली. तक्रारीच्या आधारावर पडताळणी-दिनांक 15/10/2025 रोजी करण्यात आली. यादरम्यान यातील आरोपी गृहपाल प्रवीण तळेगावकर यांनी तक्रारदाऱ यांना  लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी भोजन पुरवठा केल्याचे माहे मार्च-एप्रिल, मे,जून, जुलै -ऑगस्ट महिन्याचे  बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात व माहे सप्टेंबर चे  बिल काढून देण्यासाठी 7 टक्के प्रमाणे तडजोडी अंती 30 हजार रुपयाची लाचेची मागणी करून पहिला हप्ता 20 हजार रुपये  आता आणून देशील  व उर्वरित बिल मंजूर झाल्यावर 10 हजार रुपये आणून देशील म्हणून लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे.पंच समक्ष २० हजार रुपये
लाचेची रक्कम घेतांना रंगेहात पकडण्यात आले . या दरम्यान आरोपीकडून  रु.21,670/- नगदी,   रियलमी narjo 60 5G कंपनीचा मोबाईल इ. किमती 4000/ जप्त करण्यात आले. मोबाईल हॅन्डसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार जिल्हा गोंदिया येथे कलम 7 भ्र.प्र. अधि. 1988 अन्वये गुन्हा दाखल  करण्याची कार्यवाही सुरु आहे.
    *यांनी केली कारवाई* 
अरविंद राऊत, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया.
पर्यवेक्षक अधिकारी व तपास अधिकारी उमाकांत  उगले, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया.सापळा पथक 
सपोपनी चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय बोहरे, मंगेश काहलकर ,अशोक कापसे, संतोष शेंडे, दीपक भाटबर्वे,पोलीस नाईक संगीता पटले, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, रोहिणी डांगे यांनी कारवाई केली आहे.