लोकशाही एक्सप्रेस
देवरी तालुक्यातील एका अंगणवाडीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना देवरी तालुक्यातील देवलखेडी येथे समोर आली आहे माहिती देण्यात येत आहे की एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने सहा महिने ते तीन वर्ष बालकांना पोषण आहार दिल्या जाते .मात्र पुरवठा धारकांकडून निकृष्ट दर्जाचे पॅकेट पुरवल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना देवरी तालुक्यात समोर आली आहे .पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर मिळालेला आहे यामध्ये एकात्मिक बालविकास व अंगणवाडी केंद्राची चूक नसून पुरवठा धारकाची चूक असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल पटले यांना विचारणा करण्यात आली त्यांनी सांगितले की या प्रकरणाची माहिती मिळालेली आहे . प्रकरण गंभीर असल्यामुळे तात्काळ प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
✍️भरत घासले: लोकशाही एक्सप्रेस गोंदिया