अपघातात पोलिस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क 
दोन दुचाकींची समोरासमोर  जोरदार धडक झाल्याने, दुचाकी चालक पोलिस कॉन्सटेबलचा जागीच मृत्यू झाला. गोंदिया पोलीस मुख्यालय येथे कार्यरत भरत तुकाराम रामटेके (५५, बेला) असे मृताचे नाव आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरून प्रवास करणारे पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात रविवार दिनांक  ७ सप्टेंबर रोजी २९२५ रोजी  दुपारी १२:५० वाजताच्या सुमारास मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुजबी (बेला) गावाजवळ घडला. 
 प्राप्त माहीतीनुसार खरबी (नाका) येथील कोल्हटकर दांपत्य आदर्श रंजीत कोल्हटकर वय (३६), पत्नी किरण आदर्श कोल्हटकर वय (३०), मुलगी अधिरा आदर्श कोल्हटकर वय (७) तर नऊ महिन्याची चिमुकली आदी परिवार भंडाऱ्याहून आपल्या स्वगावी खरबी (नाका) येथे दुचाकी क्रमांक एम एच ३६-एस ७९९९ ने येत होते. दरम्यान दवडीपार (बेला) या रस्त्याने बेला येथील सुभाष वार्ड रहिवासी व गोंदिया येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी भारत तुकाराम रामटेके वय (५५) हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच-३६-क्यू-३९१५ ने येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची सामोरासमोर जोरदार धडक झाली. यात पोलीस कर्मचारी भारत रामटेके   यांचा जागीच मृत्यू झाला. तर कोल्हटकर परिवार जखमी झाले. भरत रामटेके यांचे निवृत्तीसाठी फक्त ३ वर्षे शिल्लक होती. रामटेके हे पोलिस मुख्यालय गोंदिया येथे कार्यरत होते.