लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पळसगाव भदूटोला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसून आला शेती पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक वाघाने हल्ला केला मात्र शेतकऱ्याच्या सावधगिरीने शेतकरी थोडक्यात बचावला या घटनेत शेतकऱ्याच्या पाठीवर जखमा दिसून आल्या . रामदास कापगते असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास समोर आली.शेतात वाघ दिसून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आला आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर पोहचून घटनेची सखोल माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.