लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
वनपरिक्षेत्र कार्यालय गोठ्णगाव नजीकच्या संजयनगर ( बंगाली कॅम्प ) येथे आज (ता.२५ ) पहाटे पाच वाजताच्या दरम्यान स्वतःच्या घरी लघुशंकेला गेलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट वाघाने हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव वंश प्रकाश मंडल ( वय५) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार,वंश आज पहाटे पाचच्या सुमारास झोपेतून उठून अंगणात लघुशकेला गेला दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट वाघाने त्याच्यावर झडप घातली. जवळ असलेल्या आजीने आरडा ओरड केली, परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी धावपळ केली. बिबट्याने जंगल परिसरात नेऊन त्याच्या मानेवर वार केला. दरम्यान बरीच आरडा ओरड झाल्याने वाघ चिमुकल्या वंशला जागेवरच टाकून पसार झाला.लागलीच गावकऱ्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.