ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु लोकशाही एक्सप्रेस

            लोकशाही एक्सप्रेस 
 गोंदिया, दि.२० : शैक्षणिक सत्र 2025-26 करीता इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतीगृहामध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेअंतर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शासनाच्या http://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर बी.ए./बी.कॉम./बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए./एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) 17 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज भरुन ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिन्ट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.
         जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांनी वसतिगृह तसेच आधार व स्वयंम योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ओबीसी मुला-मुलींचे वसतीगृह गोंदिया येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक किशोर भोयर यांनी केले आहे.