लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री श्री ज्ञानेश्वरी दीदी यांच्या मार्गदर्शनात द्वारका धाम दर्शन तीर्थ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात आरवी ते शिर्डी येथून 9 सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे ही यात्रा द्वारका धाम दर्शन कार्यक्रमांतर्गत अनेक तीर्थस्थळांना भेट देणार आहे ज्यामध्ये अनेक दर्शनीय प्रेक्षकीय स्थळांच्या समावेश आहे ही यात्रा ९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि १८ सप्टेंबरला परतीचा प्रवास होणार असल्याची माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे. ज्या श्रद्धाळूंना द्वारका धाम दर्शन करायचे आहे त्यांनी त्वरित सदर बातमी दिलेल्या पत्रिकेत दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपली यात्रा सुखद करावी .
👉द्वारका धाम ची थोडक्यात माहिती
द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती असा उल्लेख महाभारतात आहे. हे शहर गुजरात राज्यात आहे. इतिहासकारांच्या मते, गुजरातचे द्वारकाधीश मंदिर भगवान कृष्णाच्या पणतूने बांधले आहे. अनादी काळापासून मंदिराचा विस्तार होत आहे. १७ व्या शतकात त्याचा व्यापक विस्तार झाला. तत्पूर्वी आदिगुरू शंकराचार्यांनी द्वारका मंदिरात जाऊन शारदा पीठाची स्थापना केली. हे मंदिर २५०० वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. द्वारका हे द्वापर युगातील शहर होते, जे आता महासागरात लीन झाले आहे. सध्या या पवित्र ठिकाणी द्वारकाधीश मंदिर आहे. द्वारकाधीश मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला 'मोक्षद्वार' आणि दुसऱ्या दरवाजाला 'स्वर्ग द्वार' असे म्हणतात. मंदिरात भगवान श्रीकृष्णाची चांदीच्या रूपात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तेथील कृष्णमूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी द्वारकेला अवश्य जावे.