लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क गोंदिया
तिरोडा तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. झाडावर वीज पडल्याने धावत्या दुचाकी वर झाड कोसळले या घटनेत वडीलाचा मृत्यू झाला तर शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार ७ जुलै सकाळच्या सुमारास सतोना बोपेसर मार्गावर घडली. जीवचंद यादोराव बिसेन (४६) असे मृत वडीलाचे तर चिराग जीवचंद बिसेन (१६) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.
जीवचंद बिसेन हे वडेगाव येथील रहिवासी असून मुलगा चिराग यास शाळेत सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच ३५ एपी ९३७० ने तिरोडाकडे जात होते. यावेळी अचानक सातोना-बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेवरील करंजीच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाड रस्त्यावर धावत असलेल्या दुचाकीवर कोसळला. या झाडाखाली दबल्याने जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला तर चिराग हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी केली आहे.