लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया
गोदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा, धनगर इतर अनेक जातींनी आदिवासींमध्ये केलेल्या घुसखोरी विरोधात खऱ्या आदिवासींचा विशाल आक्रोश मोर्चाचे आयोजन येत्या सोमवारी (दि.०६) रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. या मोर्चात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रासह गोंदिया जिल्ह्यातील ख-या आदिवासी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासनाला आपली सामाजिक एकता दाखवावी, असे आवाहन या क्षेत्राचे माजी आमदार तथा शिवसेनेचे लोकप्रिय नेते सहषराम कोरोटे यांनी शुक्रवार दि.०३) रोजी
एका प्रसिध्दी पत्रका द्वारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात सहषराम कोरोटे यांनी म्हटले आहे की,
आपण जेव्हा जेव्हा सांस्कृतिक, संवैधानिक अधिकाराबद्दल गाफील राहिलो, तेव्हा तेव्हा आपल्या संवैधानिक अधिकारांवर गैर आदिवासींकडून आक्रमण, अतिक्रमण आणि संक्रमण झाले आहे. मात्र आपण बदलत्या जगामध्ये आपले संवैधानिक अधिकार, सांस्कृतिक ओळख (लैंड ओनरशिप) जल, जमीन, जंगलावरील सामूहिक दावेदारी पूर्णताः कायम ठेवू शकलो नाही. आपण आपल्या सांस्कृतिक, संवैधानिक अधिकाराबद्दल सदैव गाफील राहिल्यामुळेच आज देशातील एकेकाळी देशभर भटकंती करत असणाऱ्या विविध जाती ब्रिटिश गॅझेट / हैदराबाद गॅझेट च्या आधारे आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये येण्याचा काटोकाट प्रयत्न करीत आहे. हे पूर्णपणे राजकीय प्रेरित षडयंत्र, कपट, कारस्थान असून बंजारा, धनगर इत्यादी तत्सम जमाती, नामसाधर्म्य असणाऱ्या जमाती पूर्वाश्रमीचे भटक्या व्यापारी समाज आहे. ते ब्रिटिश काळात मीठ, धान्य, जनावरे, लाकूड, हत्यार असे विविध वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करत होते. बंजारा भटक्या जातींनी राजपूत वतनदारी भोगून दक्षिणेकडील हैदराबाद, आदिलाबाद करीमनगर, वारंगल भूभागात शिरकाव करून आदिवासींच्या जमिनी लुटल्या, आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुसुचित जमातीची यादी तयार करताना हे लक्षात आले की काही भटक्या जाती, जमातीचे सांस्कृतिक आधार घेऊन अनुसूचित जमातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे १९५० मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी कलम ३४२ अंतर्गत अनुसूचित जमातीची यादी जाहीर करून देशातील आदिवासींना परिभाषित केले. भारतीय संविधानामध्ये भटक्या जाती (NT-C) DHANGAR 3.5%, आणि भटक्या जाती BANJARA 3% आरक्षण दिले आहे. मात्र ह्या जातीना फक्त आदिवासींचेच आरक्षण (आदिवासी दर्जा) का पाहिजे आहे, विविध कोर्टाच्या निर्णयात हे स्पष्ट
झाले आहे की, आदिवासी होता येत नाही तर आदिवासीमध्ये जन्म घ्यावा लागतो. तरी बंजारा, धनगर, गोवारी अशा अनेक जाती, सत्ता संपत्ती चा धाक दाखवून आदिवासींचे हक्क अधिकार आरक्षण लाटण्यासाठी शासनाची दिशाभूल करत आहे, हे आदिवासी समुदाय कदापी खपवून घेणार नाही. त्यासाठी सर्व समाज बांधवानी येत्या ०६ ऑक्टोबर २०२५ ला जसे जमेल तसे, कोणत्याही साधनांची वाट न पाहता आपल्या अंतिम पिढीच्या रक्षणासाठी, रस्त्यावर येऊन, जात, व्यक्ती, पक्ष, क्षेत्र, नेता, बाजूला सारून फक्त आणि फक्त आपल्या मुला-बाळाच्या भविष्यासाठी गोंदिया येथील भव्य, विशाल आक्रोश मोर्चात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रासह गोंदिया जिल्ह्यातील ख-या आदिवासी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शासनाला आपली सामाजिक एकता दाखवावी. असे आव्हान या क्षेत्राचे माजी आमदार तथा शिवसेनेचे लोकप्रिय नेते सहषराम कोरोटे यांनी आज शुक्रवार (ता.०३ ऑक्टोंबर) रोजी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.