महसुल विभागांतर्गत सेवा पंधरवाडा शिबिराचे आयोजन लोकशाही एक्सप्रेस गोरेगाव

       लोकशाही एक्सप्रेस गोरेगाव
 गोरेगाव तहसील कार्यालयातंर्गत येणा-या २७ साझ्यातील संजय गांधी योजना व इंदिरा गांधी योजनेतील (निराधार योजना)लाभार्थ्याचे बॅक खाते  डिबीटी करण्यासाठी व लाभार्थ्यानी या शिबिराचा लाभ घेता यावा याकरीता तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांच्या मार्गदर्शनात महसुल विभागांतर्गत दिनांक २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत सेवा पंधरवाडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
   संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी (निराधार योजना)अनुदानापासुन वंचित राहु नये म्हणून नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यत सेवा पंधरवाडा महसुल विभागांतर्गत राबविण्यात यावे असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  तहसीलदार यांना देण्यात आले होते.त्या अनुषंगाने पहील्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संगायो/इंगायो (निराधार योजना) सर्व लाभार्थ्याचे बॅक खाते डिबीटी करण्यासाठी २७ साझ्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्व लाभार्थ्याचे बॅक  खाते डिबिटी करण्यात आले.या  पंधरवाडा शिबिराच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार प्रज्ञा भोकरे,नायब तहसीलदार अश्विनी नंदेश्वर, सहाय्यक महसुल अधिकारी निश्चल कुंभलवार, ग्राम महसुल अधिकारी, महसुल विभागांतर्गत युवा प्रशिक्षक यांनी विशेष प्रयत्न  केले.