लोकशाही एक्सप्रेस न्यूज
गोरेगांव तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असुन त्यात आज २४ जुलै ला ग्राम पंचायत कडुण जिल्हा परिषद शाळा येतील पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट बॅग, वह्या, पेन्सिल कंपास इत्यादी साहित्य चे वाटप करण्यात आले त्यात जिल्हा परिषद शाळा येतील विध्यार्थी वेळोवेळी मागणी ला अनुसरून सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या संकल्पनेतून शाळेतील वर्ग १ ते ७ च्या विध्यार्थ्यांना क्रिडा साहित्य फुटबॉल, कब्बडी ड्रेस, क्रिकेट किट व इतर क्रीडा साहित्य देण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख उपस्थिती उपसरपंच मोहनलाल पटले, ग्रामपंचायत अधिकारी पी बी टेभंरे, सदस्य योगराज भोयर, भिवराज शेंन्डे, खेमराज वाकले,प्रभा पंधरे,पुस्तकला पटले, चन्द्रकांता पटले, पुजा डोहळे,नेहा उके,शाळा समितीचे अध्यक्ष खेमराज पटले, मुख्याध्यापक सी के बिसेन,बांते सर,आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले गावाची जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे जिल्हा परिषद शाळा येतील विध्यार्थीचे शारिरीक, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शारिरीक व्यायाम होणे सुध्दा महत्वाचे आहे या करिता विध्यार्थ्यांना क्रिडा साहित्य ची सुध्दा आवश्यक आहे याकरिता ग्राम पंचायत मोहाडी पुढाकाराने ७०,०००₹ चे क्रिडा साहित्य देण्यात आले पुढे सुध्दा वेळोवेळी मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहु असे प्रतिपादन केले