लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया
जगप्रसिद्ध अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठाचे माजी सहाय्यक प्रा. दि.असोसिएशन ऑफ रिसर्च एकेडमीशियन अँड यंग एक्विस्ट अरण्य भारतचे संस्थापक श्रेयस दिलीपराव पन्नासे व प्रा. डॉक्टर नितीन गणोरकर या संशोधकांनी गोंदियातील नामावंत एन एम डी महाविद्यालया ला भेट देऊन भूगोल च्या विद्यार्थ्यांना संशोधक विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या संदर्भात माहिती देण्यात आली की संशोधक श्रेयस पन्नासे यांची भारतीय संसदेत राज्यसभा संशोधक आणि अभ्यास योजना यामध्ये संशोधक म्हणून निवड करण्यात आली. ते आदिवासी समुदाय जीवनावर संशोधन करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी जीवन, नैसर्गिक संसाधने वने या विषयावर संशोधनाकरिता प्रा. डॉक्टर नितीन गणोरकर यांच्या सोबत गोंदिया जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन माहिती घेत आहेत. या दरम्यान संशोधक श्रेयस पन्नासे व प्रा. डॉ. नितीन गणोरकर यांनी गोंदियातील एन एम डी महाविद्यालयाला भेट दिली. प्राचार्य डॉ. रविद्र मोहतुरे,भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. शशीकांत कडू यांचेशी संशोधन व फेलोशिप बददल चर्चा केली.त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक' जिवनात व्यांचा फायदा व्हावा यादृष्टीने, फेलोशीप कशी मिळविता येते. या विषयावर संशोधक श्रेयस पन्नासे व प्रा.डॉ. नितिन गणोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यामध्ये बुध्दीच्या जोरावर आपन पुढे जाउ शकतो असा मोलाचा सल्ला ही संशोधक श्रेयस पन्नासे व प्रा.डॉ. नितीन गणोरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी भूगोल विभागाचे प्राध्यापक नीलकंठ भेंडारकर प्राध्यापक डॉक्टर अंकित जायसवाल प्राध्यापक शुभांगी डडमल उपस्थित होते.