लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार,जिल्ह्यात जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत असुन डेंग्यु आजाराबाबरात जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय व आश्रमशाळेत आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.दि.24 जुलै रोजी गोरेगाव तालुक्यातील मनीभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळा येथे हिवताप-डेंग्यु आजाराबाबत विविध विषयावर मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.कीटकशास्त्रीय तंत्रज्ञ अनिल चोरवाडे यांनी मनीभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना बॅनरच्या माध्यमातुन डासांचे प्रकार व त्यापासुन होणारे आजार,त्यांचे लक्षणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.विद्यार्थ्यांना अॅनोफिलीस मादी,एडीस आणि क्युलेक्स इत्यादी कीटक ओळखण्यासंबधी माहीती देण्यात आली, हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र,पाण्यात डासांची होणारी वाढ,डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढ्ळणारे बदल,किटकशास्त्रीय सर्वेक्षण,हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याची विस्तृत माहीती उपस्थितांना दिली.
अनिल चोरवाडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवुन त्यांच्या विविध शंकेचे निरसन केले.
सोनी येथील एमआय पटेल आरोग्य शिक्षण कार्यक्रम उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक टि.जी.कोडापे,केंद्रप्रमुख यु.एम.बोपचे शिक्षकवृंद ए.के.बिसेन,ओ.ए.राऊत,पि.एस. राठोड,एस.एस.रहांगडाले,एम.वाय.ठाकरे,व्हि.डी.पटले,जे.एच.फुले तर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका एम.बी.पारधी , शिक्षक रिता पटले,ओ.डब्ल्यु.पारधी,एस.एम.वैद्य, आर.ए.राऊत,अनामिका टेंभुर्णे तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य निरिक्षक बि.ए.हेडाऊ,आरोग्य सहाय्यक पी.व्ही.डोंगरे,आरोग्य सेवक हर्षद नान्हे,आरोग्य सेविका सी.बी.घासले उपस्थित होते.