लोकशाही एक्सप्रेस न्यूज
गोंदियात मुसळधार पाऊस 25 जुलै च्या रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एकीकडे बळीराजा सुखावला आहे तर दुसरीकडे गोंदिया , गोरेगाव, तिरोडा शहरात मात्र अनेक ठिकाणी तुडुंब पाणी भरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. चाकरमान्यांना सकाळी आपल्या कामावर जाताना पावसाचा सामना करावा लागला. कारण अनेक रस्त्यावर पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नगरपरिषद चा गलथान पणा समोर आला आहे अनेक ठिकाणी डबके साचले आहेत प्रशासनाकडून सुद्धा पाण्याचा अलर्ट देण्यात आला होता. नदीकाठच्या भागातील लोकांना देखील आधीच सतर्क केलेले आहे, मुसळधार पाऊस सुरू असून सध्या तरी कोणतीही घटना झालेली नाही सकाळी आठ वाजता देखील गोंदिया शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजच्या पावसामुळे गोंदियावासी जरी सुखावला तरी प्रशासनाच्या नियोजना अभावामुळे शहरवासीयांना चांगलाच फटका बसत आहे.