आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने 1 कोटी 70 लाखांच्या निधीतून जयस्तंभ चौक बस स्थानकाचा होणार आधुनिक सुशोभीकरण
लोकशाही एक्सप्रेस गोंदिया
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जयस्तंभ चौकाला गोंदियाचे हृदयाचे ठिकाण म्हटले जाते. या चौकातील बस स्थानकाकडे मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित केल्या जात होते. शहरवासीयांची मागणी होती की या अत्यंत गजबजलेल्या चौकात एक आधुनिक आणि सर्वसुविधायुक्त बस स्थानक उभारले जावे.
आता या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले जात असून, आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे **1 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून** जयस्तंभ चौक बस स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ही केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, शहराच्या जीवनमानाला नवे परिमाण देणारे परिवर्तन ठरणार आहे.
**नवीन बस स्थानक कसे असेल?**
नवीन बस स्थानक अत्याधुनिक वास्तुविशारद संकल्पनेसह आणि सर्व नागरी सुविधा असलेल्या स्वरूपात बांधले जाईल. त्यामध्ये यांचा समावेश असेलः
✅ स्वच्छ व सुंदर प्रतीक्षालय
✅ महिलांसाठी, पुरुषांसाठी व दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छ व सुसज्ज शौचालय
✅ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा
✅ डिजिटल माहिती फलक
✅ प्रकाश व्यवस्था आणि हरित सौंदर्यीकरण
✅ CCTV निगराणी व सुरक्षा यंत्रणा
काय म्हणाले आमदार विनोद अग्रवाल
> *"हे केवळ एक बस स्थानक नाही, तर गोंदिया शहराच्या शिस्त व अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे. जनतेला अनेक वर्षांपासून जे त्रास सहन करावे लागत होते, त्या वेदनेचा आता शेवट होणार आहे. आम्ही या परिसराला स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट बनवणार आहोत."*
विनोद अग्रवाल
आमदार, गोंदिया