भरत घासले
इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगाराच्या कल्याणासाठी शासनाने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वितरण योजनेस मान्यता दिली आहे.
या संचाचे वितरण लवकरच केले जाईल अशी माहिती ग्रामविकास ग्रामीण रोजंदारी बांधकाम कामगार संघटना गोंदियाचे जिल्हा संघटक सुरेंद्र गेडाम यांनी दिली या अत्यावश्यक संचामध्ये कामगारांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा वस्तूच्या समावेश आहे यात पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, 25 किलो क्षमतेची धान्य साठवण कोठी, 22 किलो क्षमतेची दुसरी धान्य साठवण कोठी, बेडशीट, चादर, ब्लॅंकेट, एक किलो क्षमतेच्या साखरेचा डबा, 500 ग्राम क्षमतेच्या चहा पावडरचा डबा आणि 18 लिटर क्षमतेच्या वॉटर प्युरिफायर या वस्तूच्या समावेश आहे लवकरच या संदर्भात शासन स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून कामगारांना लाभ देण्याचे धोरण आखण्यात आले आहे प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच या संचाचे वितरण केले जाईल याशिवाय नव्याने नोंदणी झालेल्या कामगारांच्या सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली आहे ज्याचे वितरण लवकरच सुरू होईल.