लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
गोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती आणि रामेश्वर महारवाडे यांचा वाढदिवस यंदा २० मे रोजी थाटामाटात आणि सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला. केवळ औपचारिक शुभेच्छांचाच नाही, तर पर्यावरणविषयक बांधिलकी जपत तब्बल २५० वृक्षांची लागवड करून त्यांनी ग्रामस्थांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम ग्रामपंचायत ते पंचायत समिती गोरेगाव परिसरात पार पडला. वाढदिवसाच्या निमित्ताने ‘हरित ग्राम’ संकल्पनेचा पुरस्कार करत रामेश्वर महारवाडे यांनी गावाच्या पर्यावरण संवर्धनाचा नवा अध्याय लिहिला.
भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महारवाडे हे ग्रामीण भागातील समस्या गावातच मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राहतात. आपल्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांत गावाचा कायापालट झाला आहे. "दहा वर्षांपूर्वी गाव कसे होते आणि आज गाव कसा आहे, याचा अभ्यास केल्यास परिवर्तनाची दिशा स्पष्टपणे दिसून येते," असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
या खास दिवशी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाचा जल्लोष केला. रामेश्वर महारवाडी यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली. यामध्ये
गोंदिया जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत,
ग्रामपंचायत सरपंच योगिता देशमुख,
उपसरपंच विजय सहारे,
सदस्य तुकाराम मुनेश्वर, ललिता मेंढे, ज्योतीबाई साखरे,तसेच तरुण नेतृत्वात कोटांगले, देवा सहारे, दीनदयाल फुलबांधे,
ग्रामसेवक सूर्यवंशी, कटरे, डहाके,
सामाजिक कार्यकर्ते डाकलाल पारधी, नेतराम फुंडे, सतीश डोये, सुखचंद नागरिकर,आणि अन्य ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमातून राजकारणासोबत समाजकार्याचे दर्शन घडवणारे पंचायत समिती उपसभापती रामेश्वर महारवाडी हे आजच्या युवा नेतृत्वासाठी आदर्श ठरत आहेत.