लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क गोंदिया
सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ते असे असतात की आपल्या समाजाची सांस्कृतिक ओळख व इतिहासाची माहिती व्हावी या हेतूने समाजाचे प्रेरणास्त्रोत म्हणजेच ज्याच्या नावाने आपल्या समाजाला एक ओळख मिळत आहे अशा आराध्य दैवतांचे छायाचित्र भेट वस्तूच्या स्वरूपात देऊन प्रेरणादायी उपक्रम राबवित असतात .असाच एक पोवार समाजाचा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजा भोज यांचे छायाचित्र भेट देऊन समाजाची ओळख निर्माण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आनंद पटले असे आहे.मध्यप्रदेश राज्या नंतर गोंदिया व भंडारा जिल्ह्यात बहुसंख्य असलेला पोवार समाज हा अनेक राजकीय पक्षात सक्रिय असून गोंदिया जिल्ह्यातील राजकारणात या समाजाची मुख्य भूमिका असते. या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणून शेती आहे. प्रत्येक समाजामध्ये समाजाचे संस्थापक, महामानव, प्रेरणास्त्रोत व आराध्य दैवत असतात .आपल्या समाजाची ओळख समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचावी म्हणून आप आपल्या परीने समाजाचे कार्यकर्त प्रयत्न करीत असतात.आधुनिक युगात समाजाच्या इतिहासापासून नवीन पिढी दूर होत चालली आहे.समाजाचा,इतिहास व सांस्कृतिक ओळख टिकून राहावी म्हणून गोरेगाव तालुक्यातील तीमेजरी गावातील सामाजिक कार्यकर्ते आनंद पटले हे मागील अनेक महिन्यापासून समाजाच्या कार्यक्रमात भेट वस्तू ऐवजी समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजा भोज यांचे छायाचित्र भेट देऊन समाजाचा इतिहास समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आनंद पटले यांनी सांगितले की,समाजात कुणाचे लग्न असो, वाढदिवस, लग्न वाढदिवस असो की घराचे वास्तूपुजन असो अशा प्रत्येक कार्यक्रमात ते चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांचे छायाचित्र भेट म्हणून देतात . त्यांच्या या कार्याने निश्चितच समाजाला एक नवी प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही.