लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
वक्फ दुरुस्ती विधेयकही गुरुवारी रात्री उशिरा राज्यसभेत मंजूर करण्यात आले. 128 खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ तर 95 विरोधात मतदान केले. याआधी बुधवारी रात्री उशिरा लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली.
काय म्हणाले नड्डा - ही राष्ट्रीय हिताची बाब आहे: पक्षाचे राज्यसभेतील नेते जेपी नड्डा यांनी वक्फ विधेयकावरील त्यांच्या भूमिकेवरून विरोधकांवर निशाणा साधला. नड्डा म्हणाले- काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारपेक्षा आम्ही वक्फ विधेयकाबाबत अधिक गांभीर्य दाखवले. हे विधेयक पक्षहिताचा विषय नसून हा राष्ट्रहिताचा विषय आहे. विषय रुळावरून घसरता कामा नये.