गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायत च्या वतीने आज शनिवार 8 मार्च रोजी जागतिक महीला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिडकेपार ग्रामपंचायत चे सरपंच योगिता ताई शहारे ह्या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये गावांतील जेष्ठ वयोवृद्ध महिला शुल्काबाई कटरे, ग्रामसेविका के .एस. बैस, ग्रामपंचायत सदस्य कला ताई चौधरी, कंचनाताई शहारे, डॉक्टर निधी चौधरी , परिचारिका इश्र्वरिताई रहांगडाले , अंगणवाडी सेविका स्वर्णलता ताई टेंभुर्णीकर , लीला ताई पटले, नानेश्वरीताई टेभरे, मदतनीस भूमेश्वराताई चौधरी, रेवण बाई येडे, राऊत ताई, महिला बचत गटाच्या सीआरपी सुशीला ताई टेंभुर्णीकर , भुमेश्वराताई पटले, पोस्ट विभागाच्या कल्यानी ताई वडीचार, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी राजकुमार जी साखरे ,प्रशांत जी साखरे राजेश चुलपार आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ वयोवृद्ध शुल्क बाई कटरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून करण्यात आली.याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच योगिताताई शहारे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.उपस्थित महिलांनी महिला जागतिक दिनानिमित्त गीत गायन करून मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिवस साजरा केला.
भरत घासले