गोंदिया --सांस्कृतिक कार्य विभाग-महाराष्ट्र शासन , मुंबई मार्फत १० दिवसीय ,झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रस्तावित आहे.
झाडीपट्टी रंगभूमीचा विकास व्हावा, झाडीपट्टी नाट्य रंगभूमिचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतूने सांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून श्री विकास खारगे ,मा.मुख्यमंत्री यांचे अमूस.तथा अमूस सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक श्री विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली या प्रशिक्षण शिविराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रशिक्षण शिबिराचा माध्यमातून नवीन मुला-मुलींना नाटकाच्या तंत्राचा अभ्यास व्हावा, योग्य मार्गदर्शन मिळावे. त्यांचा कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावा यासाठी हे झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण शिबिर दिनांक 8 मार्च ते 18 मार्च२०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत होणार आहे. हे नाट्य शिबिर गोंदिया जिल्ह्यात मुन्ना उपरीकर यांचे हॉल सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे होणार आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी केवळ मर्यादित जागा असून वय वर्षे 14 ते 40 या वयोगटातील मुला-मुलींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणामध्ये कुठलेही मूल्य आकारल्या जाणार नसून प्रवेश विनामूल्य आहे. या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून झाडीपट्टी नाटकातील दिग्गज कलावंत तंत्रज्ञ लेखक हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. सोबतच प्रशिक्षण संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र सुद्धा दिल्या जाणार आहे.तसेच प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तरीही या झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेसाठी लवकरात लवकर नोंदणी करून या ठिकाणी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन गोंदिया चे शिबिर संचालक चेतन वडगाये यांनी केलेले आहे. नोंदणी साठी संपर्क क्रमांक 8956836854वर संपर्क करावा असे पत्रका द्वारे कळविलेले आहे