*महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या कामकाजाच्या सर्वेक्षणात डॉ आशिषराव देशमुख टॉप 10 मध्ये असणार..!*
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
• आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
02 मार्चला आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सावनेर येथे करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांची स्तुती करत असताना 100 दिवसांच्या कामकाजामध्ये डॉ देशमुख यांनी महाराष्ट्रातील आमदारांमध्ये सर्वप्रथम जनसंपर्क कार्यालय उघडण्याचा बहुमान मिळविला असून या जनसंपर्क कार्यालयाद्वारे लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देता येईल, असे म्हटले. सावनेर-कळमेश्वर क्षेत्राच्या सर्व जनतेला विश्वास देत ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या कामकाजाचे सर्वेक्षण होईल तेव्हा आमदार डॉ आशिषराव देशमुख टॉप 10 मध्ये असणार. सावनेरच्या जनतेने दडपशाही, गुंडगिरीला मात देऊन परिवर्तन घडवून डॉ आशिषराव देशमुख यांना निवडून दिले आहे. त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. आपल्या याच टर्ममध्ये ते मागील 25 वर्षांचा विकास करून दाखवतील. लाडली बहीण योजना बंद होणार नाही. शेतकऱ्यांना यापुढे सुद्धा विजेचे बिल शून्य येणार. माझ्या महसूल खात्याद्वारे या क्षेत्रातील सर्व प्रश्न निकाली काढून देईन."
यावेळी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी आपल्या वक्तव्यात सर्वप्रथम सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेचे आभार मानत आमदारकीचा हा विजय आशिष देशमुख यांचाच नव्हे तर संपूर्ण सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा असून सदैव जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहे, असे म्हटले. ते पुढे म्हणाले, "गेल्या 25 वर्षातील विकासाची उणीव याच 5 वर्षात भरून काढीन. आपल्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे सर्व जनतेची सेवा करून सर्व गरजू लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ आणि सर्वांना न्याय मिळवून देऊ. जनसंपर्क कार्यालयाद्वारे मोदीजींच्या स्वप्नातील शेवटच्या घटकातील जनतेला न्याय देणार. विधानसभा निवडणूक जिंकलो, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पण आपण जिंकू."
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, डॉ राजीव पोतदार, अशोक धोटे, मनोहर कुंभारे, प्रकाश टेकाडे, दादाराव मंगळे, मीना तायवाडे, जोतीताई कांबळे, प्रगती मंडल सहित हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.