गोंदिया एसीबी ची कारवाई : लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्यासह दोघांना अटक लोकशाही एक्सप्रेस गोंदिया

     लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
तक्रारदार शेतकऱ्याला शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन जोडून देण्याच्या नावावर दोन हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्यांसह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई 20 फेब्रुवारी केशोरी येथे गोंदिया एसीबीने केली. महावितरण चे केशरी निवासी रणदीप काशीराम गोखे वय ४० व खाजगी इसम मृणाल संजय ब्राह्मणकर वय 40 असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही कार्यवाही गोंदिया एसीबी च्या पथकाने केली.       सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार हे शेतकरी असून मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यांतील तुकम सायगाव येथे त्यांचे आईचे नावाने असलेल्या शेतीतील बोअरवेलवर मोटरपम्प चालवन्यासाठी त्यांचे आईचे नावाने मीटर लावलेले आहे.  17 फेब्रुवारी 2025 रोजी यातील आरोपी महावितरण चे कर्मचारी रणदीप गोखे  यांनी  तक्रारदार यांच्या शेतातील बोअरवेल वरील विद्युत मीटर खराब झाल्याचे सांगुन कनेक्शन कट केले. तक्रारदार यानी नवीन मीटर ची मागणी केली असता आरोपी यानी तक्रारदार यास तुला डायरेक्ट वायर जोडून देतो तसेच डायरेक्ट वायर जोडून वीज वापरल्या मुळे वीज चोरीची कारवाही करत नाही त्यासाठी तुला रूपये 2 हजार दयावे लागतील असे म्हणुन र 2 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. 
 तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि.कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली .लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी याने डायरेक्ट विद्युत वायर जोडून अवैधरित्या वीज वापरण्या करीता व तक्रारदार यांचे वर यापुढे कोणतीही कारवाई  न करण्याकरिता 2 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून सापळा कारवाईदरम्यान आरोपी गोखें यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक दोन खाजगी इसम मृणाल ब्राह्मणकर याने तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 2 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली .लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन केशोरी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई 
 डॉ.दिगंबर प्रधान  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर
,सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र,
संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक
ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात
पर्यवेक्षक अधिकारी उमाकांत उगले पोलीस निरीक्षक,पो. नि. उमाकांत उगले, स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. संजय कुमार बोहरे,मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे,अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, म.ना.पो.शि.संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि  दिपक बाटबर्वे यानी केली.  
     लाचेची मागणी करा तक्रार        
*गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य रकमेची/लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी  संपर्क साधावा.
 1) *डाॅ.श्री दिगंबर प्रधान, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923185566*         
 2) *श्री विलास काळे*
*पोलीस उप अधीक्षक*
  *ला. प्र.वि .गोंदिया*
 *मो. नं.9867112185*
*श्री राजीव कर्मलवार* *पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदिया*
मो. क्र.9021452760
 *श्री उमाकांत उगले*
*पोलीस निरीक्षक*
ला. प्र. वि. गोंदिया 9664959090
*कार्यालय दुरध्वनी क्रं* 07182251203 
*@ टोल फ्रि क्रं. 1064*.               भरत घासले
      ==================