जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिप सभापती डा.लक्ष्मण भगत यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार प्रतिनिधी गोरेगाव

                प्रतिनिधी गोरेगाव 
 गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य- डा .लक्ष्मण भगत यांचे मराठी पत्रकार संघ गोरेगावच्या वतीने  शाल,  श्रीफळ व रोपटे देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. 
 यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भरत घासले, कार्याध्यक्ष प्रमोद नागनाथे, उपाध्यक्ष देवेंद्र रहांगडाले , सचिव दिलीप चव्हाण, डिलेश्वर पंधराम, माजी समाज कल्याण सभापती विश्वजित डोंगरे व सामाजिक कार्यकर्ता निसर्ग मित्र सचिन पटले आदि मान्यवर उपस्थित होते.या दरम्यान भरत घासले, प्रमोद नागनाथे, डिलेश्वर पंधराम यांनी संघाच्या कार्याची  माहिती दिली. सत्कार समारंभाचे  संचालन सचिव दिलीप चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन देवेंद्र रहांगडाले यांनी केले.