आज रविवार सकाळी १० वाजे पासून होणार मंगल कळस यात्रेचे शुभारंभ* लोकशाहीएक्सप्रेस गोरेगांव

.     लोकशाही एक्सप्रेस गोरेगांव 
पिंडकेपार येथे आज रविवार २ फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन ग्राम उत्सव समिती पिंडकेपार च्या वतीने करण्यात आले आहे. श्री शिव महापुराण कथेची सुरुवात मंगल कळस यात्रेने होणार असून ही मंगल कलश यात्रा कन्हारटोला हनुमान मंदिर येथून सकाळी १० वाजेपासून प्रारंभ होत आहे. . मंगल कलश यात्रा  कन्हारटोला येथून रेटोली व पिंडकेपार गावातील प्रमुख मार्गाने प्रा. चंद्रकिशोर पटले यांच्या भव्य मैदानात आयोजित श्री शिव महापुराण कथा स्थलापर्यंत होणार आहे. व सायंकाळी सहा वाजेपासून कथेला सुरुवात होणार आहे. श्री शिव महापुराण कथेला यशस्वी करण्याचे आव्हान ग्राम उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे