गोरेगाव पंचायत समितीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन लोकशाही एक्सप्रेस गोरेगाव

    लोकशाही एक्सप्रेस गोरेगाव 
 ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शिष्टमंडळाच्या मागणीला गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी पंचायत यांनी दुर्लक्ष करत मनमर्जीने सुधारीत किमान वेतन फरकाची रक्कम बॅक खात्यात जमा केली.या अन्यायाविरोधात ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सोमवारी (ता०६) पासु बेमुदत बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. 
     ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतन फरकाची रक्कम सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या नऊ महीण्याची रक्कम जिल्हा परिषदेने पंचायत समिती गोरेगाव ला वर्ग केले. वेतन फरकाची रक्कम वाटपाचे मार्गदर्शक सुचना राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज  पुणे यांनी दिले असून सुद्धा पंचायत समितीने (ई आर पी) संगणक प्रणालीचे सहानिशा मर्जीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात अन्यायकारक निधी जमा करण्यात आली.दरम्यान युनियन ने आक्षेप नोंदवून गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी पंचायत यांच्याशी चर्चा करून ई आर पी नुसार रक्कम देण्यात यावी असी मागणी करण्यात आली.याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना युनियन ने निवेदन देत गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना बोलावून चर्चा करण्याची विनंती केली.उपमुख्य कार्यकारी यांनी गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी यांना बोलावून युनियन समक्ष चर्चा करून दिशा निर्देश नुसार रक्कम वाटण्याचे निर्देश दिले.तरीसुद्धा गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी निर्देशांचे पालन केले नाही.या विरोधात  ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या वतीने सोमवार पासुन  बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा सचिव छगन अग्रेल यांनी दिली आहे. पंचायत समिती गोरेगाव येथील पटांगणात आयोजित कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे तालुका अध्यक्ष धर्मराज काळसर्पे, मार्गदर्शक प्रकाश रंगारी, उपाध्यक्ष माधव सेऊतकर, कोषाध्यक्ष नीलकंठ कोल्हटकर, सहसचिव खेमराज खांडवाये, संघटक सुनील शहारे, महिला प्रतिनिधी तारा परसमोडे, रेखा लांजेवार, सदस्य चंद्रहास पारधी, रामेश्वर कटरे, धर्मेंद्र शिंगाडे, रणजीत मेश्राम, राजकुमार साखरे, सचिदानंद भावे, भुमेश्वर बोपचे आदी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. ।                 भरत घासले