राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गोरेगाव तालुक्यातील स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा येथे 25 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सतीश शहारे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व व मतदाराचा हक्क याबाबत माहिती दिली.हौसीटोला या गावी मतदारांना मतदानाचे महत्त्व व त्यांचा अधिकार या विषयाला घेऊन जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती केली. दरम्यान लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी शपथ घेण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य छंदा समरीत मॅडम , प्रा. बावनकर सर,प्रा.शहारे सर, प्रा. वाघाये मॅडम, देशमुख सर, प्रा. शेंडे सर ,प्रा. डॉ.भुस्से सर,प्रा. पावरा सर , प्रा.भेंडेकर सर, कुंडगर सर, प्रा.साळुंके सर,प्रा. फुलझेले सर, खुणे मॅडम, चौधरी सर , शेंडे मॅडम, उपस्थित होते.
भरत घासले