खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी को-ऑपरेटिव्ह सोसायटी गोंदिया येथे अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडण्यात आली .या निवडणुकीमध्ये माधवी अरविंद साखरे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवडणूक 25 जानेवारी ला निवडणूक अधिकारी गणेश कुठे यांच्या नियंत्रणात पार पाडण्यात आली. यावेळी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव संजय टेंभरे , झनक सिंह टेंभरे, नेम कुमार गोंडाणे ,मोहम्मद अझहर शेख, कादिर शेख, संजय शिवणकर ,लता भगत, दिलीप लिल्हारे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माधवी साखरे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माधवी साखरे यांनी संबोधित केले की को-ऑपरेटिव्ह सोसायटी व सभासदाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण नेहमी कटीबद्ध राहणार.