व्हाईस ऑफ मिडीयाची गोंदिया जिल्हा कार्यकारणी गठीत ◾️ लवकरच होणार तालुका कार्यकारिणीचे गठन लोकशाही एक्सप्रेस

          लोकशाही एक्सप्रेस 
गोंदिया :  व्हाईस ऑफ मिडीया गोंदिया जिल्हा शाखाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी आज, 12 डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद नागनाथे होते. यावेळी संघटन बळकटीकरण व सदस्य नोंदणी आदी विषयांवर चर्चा करून गोंदिया जिल्हा कार्यकरणी गठीत करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मॉडिया संघटनेच्या विस्तारासाठी राज्याचे कार्याध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या नेतृत्वात विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात व्हाईस ऑफ मिडीया जिल्हा शाखातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत असून आज, पार पडलेल्या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद नागनाथे यांनी सर्वानुमते जिल्हा कार्यकरणीची निवड केली. ज्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय राऊत, महेंद्र बिसेन यांची तर जिल्हा सचिव पदावर रवी सपाटे सहसचिव महेंद्र लिल्हारे, दुर्गेश येल्ले, कोषाध्यक्ष रवींद्र तुरकर, कार्याध्यक्ष शाहिद पठाण, संघटक संजीव बापट, सहसंघटक जावेद खान, प्रसिद्धीप्रमुख पदी सतीश पारधी यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून राधेश्याम भंडारकर अर्जुनी मोरगाव, राजेश तायवाडे तिरोडा, मायकल मेश्राम सालेकसा, भरतराम घासले गोरेगाव, जितू पटले आमगाव, सुनील कावळे गोंदिया, मिदूप श्रीवास्तव गोंदिया, अरविंद राऊत गोंदिया, शुभम ढोमणे गोंदिया, नवीन अग्रवाल गोंदिया, सचिन बोपचे गोंदिया, महेंद्र माने गोंदिया,आकाश वालदे गोंदिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान, वरिष्ठांच्या निर्देशानुसार सर्व तालुका प्रतिनिधींना संबंधित तालुका शाखेचे गठण करून कार्यकारिणी गठीत करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. यावेळी बैठकीत रवी सपाटे, संजीव बापट, सतिश पारधी, सुनील कावळे, दुर्गेश येल्ले, मिदूप श्रीवास्तव, आकाश वालदे आदी उपस्थित होते.                     भरत घासले