📣 राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. कारण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार. लाभार्थी महिलांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहे.
📣 अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मी स्वतः अजित पवार यांच्याशी याबाबत बोललो आहे. काही तांत्रिक बाबींवर काम सुरु आहे. परंतु येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे.
📣 टेस्ट अॅटलासचा नुकताच अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार मुंबईची पावभाजी ही जगातील 5व्या क्रमाकांची चविष्ट डिश ठरली आहे.
📣 भारताचा डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याचा पराभव केला. त्यामुळे आता डी गुकेश हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.
📣 एसटी चा प्रवास महागणार अशी माहिती काल एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुट्या भागांची वाढती किंमत हे विचारात घेऊन,
📣 2021 पासून प्रलंबित असलेली एसटीची तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भरत घासले