भाजपला मोठा धक्का बडा नेता ठाकरे गटात लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
उद्या सकळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कामकाज सुरु होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतांना विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझ्यावर अन्याय झाला, अशा शब्दात मोठी खंत व्यक्त केली.
मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सचिन शिंदेंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते. सचिन शिंदे हे माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी माहीमचे उमेदवार महेश सावंतही उपस्थित होते. निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला पडलेल्या खिंडारामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे.
या पक्षप्रवेशानंतर सचिन शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यामागचे कारण सांगितले. मी गेल्या 20 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी पक्षवाढीसाठी काम केलं. पण मला योग्य तो न्याय मिळाला नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटलो. मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत, असे सचिन शिंदे म्हणाले.
यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी भाष्य केले. उद्या निकाल काय लागतो, याची उत्सुकता आहे. सचिन जी तुमचं स्वागत आहे. तुम्ही व्यथा मांडलीत मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्यावर अन्याय होणार नाही. आपण उद्याची वाट बघतोय. काल जो बॉम्ब फुटला तो 4 दिवस आधी फुटला असता बर झालं असतं. घोटाळेबाजांच काय करणार ते केंद्र सरकार बघेल. नोटांचा बॉम्ब वसई विरारला फुटला ते सर्वांनी पाहिलं. सचिन जी तुमच्या मनात जे काही करायचंय ते मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले