गोंडगोवारी जमातीचा निवडणुकीवर बहिष्कार कायम पत्रकार परिषदेत दिली माहीती

      लोकशाही एक्सप्रेस गोरेगाव
 संघर्ष कृती समितीने विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत  गोंडगोवारी जमात मतदान करणार नाही.तर या निवडणुकीवर संपुर्ण बहिष्कार असेल असे जाहीर  आवाहन करण्यात  आले आहे.त्यामुळे मतदानावर महाराष्ट्रात  बहिष्कार कायम आहे असी माहीती पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. पत्रकार परिषद गोरेगाव येथील गुरूकूपा लाॅन येथे शुक्रवारी (ता १५) घेण्यात आली.
   यावेळी विजयकुमार नेवारे,सुरेशकुमार नेवारे,अनिल राउत,राजेश सोनवाने,नरेंद्र भोंडे,कुंभकरण राउत,भिमराज सोनवाने, दिपा राउत,वैशाली राउत,अनिता नेवारे,नंदलाल सोनवाने उपस्थित होते.
   शासनाने गोंडगोवारी जमातीची २४एप्रील १९८५ च्या शासन निर्णयातील असंविधानिक व चुकीची माहीती सर्वोच्च न्यायालयात दिली.त्यानुसार २०२०ला निकाल जाहीर करण्यात आला.पण गोंडगोवारी जमातीने संस्कूती प्रमाणे दुरुस्ती करण्याची मागणी शासनाला करण्यात आली.ती मागणी मान्य करण्यात आली नाही.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत गोंडगोवारी जमातीचा बहिष्कार असेल असी घोषणा समितीने केली. गोंदिया जिल्ह्य़ात दिड लाख गोंडगोवारी जमात आहे.महाराष्ट्रात गोंडगोवारी जमातीचा बहिष्कार ठाम आहे.त्यामुळे राजकीय पक्षांचे गणित बिघडणार आहेत. आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्कासाठी लढाई लढत राहणार आहे.असी माहीती पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली.