प्रहार जनशक्तीचे उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे माणूस चांगला पण.....

         लोकशाही एक्सप्रेस
               भरत घासले 
प्रहार जनशक्ती पक्ष , परिवर्तन महासक्ती व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे संयुक्त अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.सुगत  मनोहरराव चंद्रिकापुरे हे चांगले उमेदवार असून माणूस पण चांगला आहे. असे नागरीकांचे म्हणणे आहे मात्र त्यांच्यासोबत क्षेत्रातील विद्यमान मोठे नेते , लोकप्रतिनिधी नसल्याने ते कोणत्या क्रमांकावर रहाणार आहेत हे मात्र निश्चितपणे सांगता येणार  नसले तरी त्यांच्यासोबत एक मोठा विशिष्ठ मतदार वर्ग व काही समर्थक ठाम पणे काम करत असल्याचे त्याच्या प्रचार सभेवरून दिसून येत आहे. 
 
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यामान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तैयार झाले . एक गट शरदचंद्र पवार यांचा तर दुसरा अजित पवार यांचा गट. खासदार प्रफुल पटेल यांचे समर्थक असल्याने आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे हे अजित पवार गटात सामील झाले. विद्यमान आमदार मनोहरराव चांद्रिकापुरे  यांनी मागील वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते . मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने(अजित पवार गट) भाजपाचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून अर्जुन मोरगांव विधानसभा क्षेत्रातून बडोले यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी घोषित केली. त्यामुळे विद्यमान आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांनी पक्षातून बंडखोरी करत आपल्या मुलाला डॉ. सुगत चंद्रकापुरे यांना तिसऱ्या आघाडीतून म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षातून निवडणुकीत उभे केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात डॉ. सुगत चंद्रिकपुरे यांना चांगला प्रतिसाद दिसताना मिळतो .नागरिकांचे म्हणणे जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो तेव्हा त्यांच्या अनेक नागरिकांच्या मुखातून एकच शब्द निघतो की डॉ. चद्रिकापुरे  हा माणूस चांगला असून कामाचा आहे . त्यानी अनेक कामे या क्षेत्रात केली आहे.  वयक्तिक मदत सुद्धा त्यानी केली आहे. मात्र क्षेत्रातील मोठे विद्यमान नेते, लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत नसल्याने त्यांना किती मते मिळतात किंवा ते शर्यतीत टिकणार किंवा नाही हे सांगता येणार नाही.  कारण की विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  या क्षेत्रातील काही कार्यकर्ते जरी चंद्रिकापुरे यांना आमचा गुप्त सपोर्ट आहे असे म्हणत असतील तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटा सोबत आहेत असे प्रचार सभेच्या वातावरणावरून दिसून येत आहे. मात्र काही कार्यकर्ते व एक मोठया संख्येने विशिष्ठ मतदार वर्ग त्यांच्यासोबत दिसून येत आहे याला मात्र नाकारता येणार नाही. 

👉गोरेगाव तालुक्यातील अडीच जिल्हा परिषद क्षेत्रात प्रतिसाद कमी
गोरेगाव तालुका हा दोन विधानसभा क्षेत्रात विभागलेला आहे.  तालुक्यातील अर्धे गावे तिरोडा गोरेगाव विधान सभेत तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये अडीच जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा समावेश करण्यात आलेला असून त्यामध्ये मुंडीपार व निंबा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आहेत.  या क्षेत्रामध्ये विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दहा कोटीच्या वर कामे केली आहेत .मात्र त्यांचा जनसंपर्क कमी असल्यामुळे त्यांच्यासोबत कार्यकर्ते कायमचे जुडू शकले नाहीत. आता डॉ. सुगत चंद्रिकापुरे हे जनशक्ती प्रहारचे जरी उमेदवार असले तरी त्यांना या अडीच जिल्हा परिषद क्षेत्रात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. विद्यमान आमदार म्हणून मनोहरराव चद्रिकापूरे यांनी आपल्या कार्यकाळात या अडीच जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना आपल्याकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरले.मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्रातील पिंडकेपार या गावातून त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत चांगलें मतदान प्राप्त झाले होते मात्र ते पाच वर्षात एकही दिवस त्या गावात पोहोचू शकले नाहीत. अशा अनेक कारणामुळे आता त्यांच्या पुत्राला डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र या क्षेत्रातील नागरिकांचे असेही म्हणणे आहे की डॉ. सुगत चंद्रिकापुरे हा माणूस चांगला आहे पण त्यांच्यासोबत क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते उभे नसल्याने ते शर्यतीत टिकणार किंवा नाही हे मात्र नक्की सांगता येणार नाही.