बच्चू कडू : प्रफुलजी अशा धमक्या देऊ नका, आम्ही आंडू-पांडू नाहीत, डॉ. सुगत चद्रिकापुरे सोबत प्रहार आहे

      लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
खासदार प्रफुल पटेल यांनी एका प्रचार सभेत मोरगाव अर्जुनीचे आमदार मनोहरराव चद्रिकापुरे यांना उद्देशून म्हटले की या भागातल्या ठेकेदारांचे पैसे राज्य सरकार थांबवेल.अशी माहिती आमदार चंद्रिकापुरे यांनी डॉ. सुगत चंद्रिकापुरे  यांच्या जाहीर प्रचार सभेत संबोधित केले. यावर बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू म्हणाले की खासदार प्रफुल पटेल सारखा माणूस अशा धमक्या देत असतील तर येत आम्ही आंडू पांडू नाही, प्रहार कसा वार करेल हे माहितच होणार नाही. प्रहार जनशक्ती डॉ. चंद्रिकापुरे यांच्या सोबत उभी आहे. प्रहार जनशक्तीचे उमेदवार डॉ.सूगत चंद्रिकापुरे यांना भरभरून मते देऊन विजयी करा. असे आव्हानही बच्चू कडू यांनी सडक अर्जुनी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत केला . यावेळी प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता .
लाडकी बहीण योजनेचा पैसा कुणाच्या बापाचा नाही 
भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी हे काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते .या संदर्भात उपस्थित पत्रकारांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी म्हटले की हा पैसा कुणाच्या बापाचा नाही सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतात त्याचा हा पैसा आहे .त्यांच्या बापाचा हा पैसा नाही. दुधाला , धनाला भाव मागितला होता पण ते सरकारला जमले नाही आणि मतांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे .आता याच लाडक्या बहिणी तुम्हाला सबक शिकवल्या शिवाय गप्प बसणार नाहीत.अशी खणखणीत टीका बच्चू कडू यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राज्य सरकारवर केली.
👉डॉ. सुगत चंद्रिकापुरे चांगला माणूस 
प्रहार जनशक्तीचे उमेदवार डॉ. सूगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार सभेला प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू सडक अर्जुनी येथे आले होते.  या प्रचार सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते . या दरम्यान मतदारांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. त्यात मतदारांनी सांगितले की डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी अनेक वयक्तिक कामे केले आहेत.  त्यांचे विचार फार मोठे असून त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे.ते जिंकल्याशिवाय राहणार नाहीत . डॉक्टर सुगत चंद्रकांपुरे हे खूप चांगले माणूस आहेत.
बॅटने पंज्याला तोडा, घडीला चकनाचुर करा:  डॉ. सुगत चंद्रिकापुरे
या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले मात्र आमच्यावर अन्याय करण्यात आला. दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारी घोषित करण्यात आली हे आम्हाला कळलेच नाही.  आता अशा पक्षांच्या उमेदवारांना धडा शिकवण्याची गरज आहे. माझे निशान बॅट आहे या बॅटने पंजाला तोडा व घडीला चकनाचुर करून मला विजयी करा असे आव्हान डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आयोजित प्रचार सभेत मतदारांना केला.